क्राईम

दोनच दिवसांपूर्वी पुण्यात राहायला आलेल्या तरुणीचा खून

  1. पुण्यात अवघ्या दोन दिवसांपूर्वी राहायला आलेल्या एका महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर तिचा पती फरार झाला असून खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
  2. भवानी पुनेंदु मंडल (वय २२, रा. नथ्थु लांडगे चाळ, छत्रपती शिवाजी चौक, कासारवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती पुनेंदु मंडल (वय अंदाजे ३२, रा. ओडिशा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  3. ही घटना २३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता उघडकीस आली. याबाबत संतोष नथु लांडगे (वय ४८, रा. नथु लांडगे चाळ, शिवाजी चौक, कासारवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
  4. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी आणि पुनेंदु मंडल हे दोघे मंगळवारी कासारवाडी येथील नथ्थु लांडगे चाळीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. मूळचे ओडिशाचे असलेले हे दांपत्य बिगारी काम करत होते.
  5. भवानी हिने घराच्या डिपॉझिटसाठी एका व्यक्तीकडून पाचशे रुपये उसने घेतले होते आणि ते दोन दिवसांनी परत करण्याचे आश्वासन दिले होते.
  6. उसने घेतलेले पैसे परत घेण्यासाठी संबंधित व्यक्ती लांडगे चाळीत आली. त्याने घरमालकाला भवानी कोठे राहते? असे विचारले. घरमालकाने त्यांना चाळीतील खोली दाखविली. मात्र, खोलीचा दरवाजा केवळ लोटलेला होता. या घटनेमुळे घातपाताचा संशय बळावला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

Related Articles

Back to top button