क्राईम
सुरेश धसांनी टाकला नवा डाव

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले. आता हे प्रकरण चांगलेच तापलं आहे. देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज पैठण शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आकावर जोरदार हल्लाबोल केला.
- आकांनी भरपूर माल जमा केला आहे. आका अंबानींनाही मागे टाकतील की काय, अशी शंका मला येत आहे. आकांकडे जे लोक काम करतात, त्यांच्याही नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्टा भागात आकांनी एक संपूर्ण फ्लोअरच विकत घेतला आहे. या प्रॉपर्टीची किंमत 75 कोटी रुपये आहे. हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहेत.
- पुण्यातील एफसी रोड भागात आकाने सात शॉप बुक केली आहेत. यातील एका एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे. या दुकानांचे नंबरसुद्धा मी आणले आहेत, असा दावा धस यांनी केला.