खेळ
ब्रेकींग! आयपीएल स्पर्धेपूर्वीच मोठा धमाका

येत्या मार्च महिन्यात आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे.
या संघातील प्रमुख गोलंदाज रशिद खानने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो गेल्या महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या रिहॅब करतोय. त्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामापर्यंत फिट होणार का? फिट झाला तरी तो आगामी हंगाम खेळणार का? असे उपस्थित होऊ लागले आहेत.
रशिद हा गुजरात टायटन्स संघाचा हुकमी एक्का आहे. २०२२ मध्ये गुजरातला जेतेपद मिळवून देण्यात रशिदने मोलाची भूमिका बजावली होती. तो जर संघातून बाहेर झाला तर हा गुजरातसाठी मोठा धक्का असेल.