महाराष्ट्र
खरी शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली यावर उद्धव ठाकरे गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाने नाकारल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. पाच न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापीठासमोर पुढील सुनावणी 10 जानेवारीला पार पडणार आहे.
महाराष्ट्र सत्ता संघर्ष उद्धव विरुद्ध शिंदे गटातील अपात्रता प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या घटनापीठाने सुनावणी पुढे ढकलली आहे.