क्राईम
वाल्मिक कराडने मला बाथरूमला येईपर्यंत मारले, आता तुरुंगात सडतोय

- मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा-मुंडे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. काही महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडने मला बाथरूमला येईपर्यंत मारले होते. पण, आता तुरूंगात सडत आहे. तो आयुष्यभर तुरूंगात सडणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावरही तीच वेळ येणार आहे, असा दावा करूणा शर्मा-मुंडे यांनी केला आहे. करूणा शर्मा-मुंडे यांनी गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली आहे.
- करूणा शर्मा-मुंडे म्हणाल्या, वाल्मिक हा दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे. त्याने मला आठ महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. बाथरूमला येईपर्यंत तो मला मारत होता. ते म्हणतात ना, राजकारण्यांनी न्याय केला नाही, तर देव न्याय करेल. वाल्मिकने मला मारहाण करून आठ महिनेही झाले नसतील, आता तो तुरूंगात सडतोय. त्याच्यासोबत लवकरच मुंडेही तुरूंगात जातील.
- सगळी कटकारस्थान, लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार किंवा महिलांवर अत्याचार करणे असो; या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे. याविरोधात मी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ सुद्धा मागितली आहे, असे करूणा शर्मा-मुंडे यांनी सांगितले.