क्राईम
सौरभ गांगुलीच्या कारचा भीषण अपघात

- बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या कारला काल दुर्गापूर एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. गांगुली एका कार्यक्रमासाठी बर्दवानकडे जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीने अचानक धडक दिली, ज्यामुळे ताफ्यातील वाहनांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
- दंतनपूरजवळ हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट वेगात नव्हत्या, परंतु एका लॉरीने अचानक कट मारल्याने चालकाने जोरदार ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी संतुलन गमावले आणि एक गाडी थेट गांगुलींच्या रेंज रोव्हरवर आदळली. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
- गांगुली सुखरूप असून ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली, परंतु पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली.