खेळ
रोहित शर्माने कॅच सोडला; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक करण्याची अक्षर पटेलची संधी हुकली

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरी मॅच आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होत आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. या मॅचमध्ये बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांची निम्मी टीम झटपट आऊट झाली. पण, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने केलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे.
- टीम इंडियाने या मॅचमध्ये दमदार सुरुवात केली. अनुभवी मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. नवोदीत हर्षित राणाने नजमुल शांतोला आऊट केले. त्यानंतर रोहितने अक्षरकडे बॉल सोपवला. अक्षरने खेळाचे चित्रच बदलले.
- अक्षरने नवव्या ओव्हरमध्ये दोन बॉलवर दोन विकेट घेत बांगलादेशला गुडघे टेकायला लावले. अक्षरकडे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक करण्याची मोठी संधी होती. पण, कॅप्टन रोहितच्या चुकीमुळे ती पूर्ण झाली नाही.
- अक्षर हा त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिकवर होता. पण रोहितने स्लिपमध्ये सोपा कॅच सोडला. अक्षरने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तन्झिद हसनला (25) आऊट केले. पुढच्याच बॉलवर अनुभवी मुशफिकुर रहीमला (0) परत पाठवलं. त्यानंतरच्या बॉलवर जाकेर अली देखील आऊट झाला असता पण, रोहितने त्याचा सोपा कॅच सोडला.
- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी अक्षरला होती. पण, तसे झाले नाही. रोहितने देखील त्याची चूक मान्य करत तातडीने हात जोडत अक्षरची माफी मागितली.