महाराष्ट्र

ब्रेकिंग! धनंजय मुंडेंना ‘या’ आजाराची लागण

  • राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराचे निदान झाले आहे. हा आजार झाल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि एक बाजू लक्षणीयरीत्या कमकुवत होते किंवा पूर्णपणे हालचाल थांबते.
  • सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
  • बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा एक न्युरोलॉजिकल विकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक कमजोरी किंवा अर्धांगवायू होतो. हा आजार फेशियल नर्व्हच्या तात्पुरत्या कमजोरीमुळे होतो आणि अनेकदा तो काही आठवड्यांमध्ये बरा होतो.
  • मुंडे यांच्या तब्येतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.

Related Articles

Back to top button