मनोरंजन
‘छावा’ने डरकाळी फोडली! शंभर कोटींचा टप्पा पार

- सध्या छावा चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. देशभरात ‘छावा’ने पहिल्याच विकेंडला शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे . सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे आता ‘छावा’ बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘छावा’ सध्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. सकाळ ते अगदी उशीरा रात्रीचे देखील शो हाऊसफुल्ल आहेत. या चित्रपटाची थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ च्या टीमने एक मोठा निर्णय घेतला.
- ऐतिहासिक कथा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या लोकप्रियतेमुळे ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना चित्रपट पाहता यावा यासाठी सकाळचे शो सुरू करण्यात येत आहे. छोट्या शहरांमधील अनेक थिएटरमध्ये सकाळचे शो सुरू झाले आहेत.
- मुंबईतील अनेक चित्रपटगृहांमध्ये रात्री १२:४५, १, १:१५, १:३० वाजताचे शो सुरू झाले आहेत. पुण्यात अनेक चित्रपटगृहांनी सकाळी सहा वाजता शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतातही या चित्रपटाला पसंती मिळत आहे.