क्राईम

ब्रेकिंग! ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरूणच मृत्यूच्या दारात

  • भारतीय खेळाडू ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हा, रजत नावाच्या एका युवकाने पंतचे प्राण वाचवले होते. आता तोच रजत मृत्यूच्या दारात उभा आहे. रजतने प्रेयसीसोबत विष प्राशन केले आहे. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, रजत मृत्यूशी झुंज देत आहे. प्रेयसीच्या कुटुंबाने रजतवर मुलीच्या हत्येचा आरोप लावला आहे.
  • रजत मुजफ्फनगरच्या शकरपूर येथील माजरा बुच्चा परिसरातील रहिवाशी आहे. तरूणीची आई कमलेश यांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी रजत त्यांच्या मुलीला फूस लावून घेऊन गेला होता. नंतर त्याने विष खाऊ घातले. कमलेश यांनी रजत आणि अन्य लोकांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या रजतची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे रजत शुद्धीवर आल्यावर पोलीस त्याचा जबाब नोंदवणार आहेत.

Related Articles

Back to top button