महाराष्ट्र
शिवाजी महाराज नसते तर भारतात…

- छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव काहीतरी वेगळे असते, असे मोठे विधान राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज नसते तर आज भारतात खूप पाकिस्तानी राहिले असते, असेही ते म्हणाले. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
- जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी राधाकृष्णन नावाने उभा आहे. माझे नाव कदाचित दुसरे काहीतरी असते. आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? नाही, ते सर्व संपले आहे. आपल्याला एकत्र राहायचे आहे. परंतु, त्याच वेळी आपण इतिहास त्याच्या खऱ्या अर्थाने लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला सत्य जसे आहे तसे माहित असले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज एकता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहिले, असेही राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले.