महाराष्ट्र
अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार?

- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. अर्थसंकल्पानंतर ही योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ही योजना बंद होणार नाही अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. ही योजना आमच्यासाठी आर्थिक मदत नाही तर जगण्याचा आधार आहे असे या महिलांनी सांगितले. यानंतर ही योजना बंद होणार नाही असे आश्वासन फडणवीस यांनी या महिलांना दिले.
- लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. यापेक्षा अधिक मदत काय करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. सन्मान निधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळत राहावेत अशी विनंती या महिलांनी केली. या मागणीचा नक्कीच विचार करू असे फडणवीस यांनी सांगितले.