सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर मुख्यालयातील पोलिसाची वैरागमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

- सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी महेश जोतीराम पाडूळे ( वय ४५) मुळ गाव रा. आंजनगाव ( ता. माढा ) यांनी सध्या रा. वैराग ( ता. बार्शी ) या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
- ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा पूर्वी राहते घरी वैराग ( ता. बार्शी ) येथे घडली. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबर वरून अकस्मात मयत म्हणून वैराग पोलिसात नोंद झाली आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, सदर पोलीस कर्मचारी वर्षभरापूर्वी वैराग पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली सोलापूर पोलीस मुख्यालय या ठिकाणी झाली होती. वैराग येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यात होते.
- सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महेश पाडूळे याने बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी वैराग येथील राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे समजताच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैराग येथे उपचाराकरिता दाखल केले होते. तेथील डॉ. सागर शिंदे यांनी ते उपचारापूर्वीच मयत झाले आहे असे सांगितले.
- मयताच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही. आकस्मित मयत म्हणून वैराग पोलिसात नोंद झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटना स्थळास भेट दिली आहे. मयताचे शवविच्छेदन बार्शी येथे करण्यात आले आहे. त्याचे मूळ गाव आंजनगाव ( ता. माढा ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा , एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.