सोलापूर : काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. नागरिकांच्या अडचणी समजताच माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी तात्काळ प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत घटनास्थळी भेट दिली.
अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. घरामध्ये शिरलेलं पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.