सोलापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Admin
1 Min Read
  • सोलापुरमध्ये काल रात्री पावसाने धुमाकूळ घातला असून पुरस्थितीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागाला देखील पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी शिरले आहे.
  • सोलापूर शहर व परिसरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
  • अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्रनगर आणि शेळगी या भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही घरांमध्ये तब्बल २ ते ३ फूट पाणी घुसल्याचे चित्र दिसले. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर पाणी साचल्यामुळे महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील प्रवास ठप्प झाला.
Share This Article