हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सोलापुर जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पावसाचा जोर इतका होता की, जणू जिल्ह्यावर आभाळ कोसळल्याची परिस्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सोलापूर शहराबरोबरच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपळगाव आणि चुंगी गावांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. आधीच भरून वाहणारे ओढे-नाले मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे गावांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी सहा वाजल्यापासून ४००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग १५०० क्युसेक होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पाण्याचा प्रवाह सुरू असताना कोणत्याही पुलाव