- सोलापूर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ मोठ्या प्रमाणावर साजरी होत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ४८ गुन्हेगारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अंतर्गत नोटीस देत मिरवणूक क्षेत्राबाहेर हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
- हे आदेश दि. ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तालयाने इशारा दिला आहे. हे आदेश पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी पारित केले असून, संबंधित इसमांना तसेच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे काढण्यात आलेल्या आदेशात म्हंटले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांचा मोठा धमाका
