साईबाबा हे जगविख्यात संत आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी राज्यासह देश आणि विदेशातील भाविकांची कायम रिघ लागलेली असते. येणारे भाविक आपापल्या पद्धतीने साईबाबांच्या चरणी भेट वस्तू अर्पण करत असतात. कुणी रोख, कुणी सोने-चांदीचे दागिने तर कुणी वस्तूंची भेट देतात. यावेळी एका भाविकाने साईबाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ‘ॐ साई राम’ या अक्षरांची भेट दिली आहे. मात्र, ही नुसती अक्षरे नाहीत तर ती सोन्यात बनवलेली अक्षरे आहेत. या अक्षरांचे दोन सेट या भाविकाने साईचरणी अपर्ण केले आहेत.
हा भक्त दुबईतील असून नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतो. त्याला साईचरणी अनमोल दान देण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे ‘ॐ साई राम’ हे शब्दांचे दोन सेट सोन्याचे तयार केली आणि त्यांची साईचरणी भेट दिली. मात्र, त्याने नाव गुप्त ठेवण्याची अट टाकल्याने साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्याचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.
दुबईतील या भाविकाचे तब्बल 1 किलो 623 ग्रॅम वजनाची ‘ॐ साई राम’ या अक्षरांचे दोन सेट बनवले आहेत. त्यांची मत 1 कोटी 58 लाख 50 हजार रुपये आहे. साई संस्थाने ही सुवर्ण अक्षरे साईबाबांच्या मागील दोन्ही दरवाजांवर लावली आहेत. ही सुवर्ण अक्षरे सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.