क्राईम
ब्रेकिंग! बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग

- तीन महिन्यानंतर बीड पोलिसांना तब्बल जाग आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना मारहाण झाली होती. दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजेसाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती. घटनेनंतर तब्बल 82 दिवसांनी अखेर कैलास फड, त्याचा मुलगा निखील फड आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
- याआधी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक झाली होती. याप्रकरणी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सांगत होतो की परळीत कायदा आणि सुव्यवस्था ही वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडेच चालवायचे. त्याचा प्रत्यय असा आहे की, ज्या मतदान केंद्रावर एवढी नाजूक घटना घडली. मी मतदान केंद्रावर गेल्यावर पोलिसांला देखील मारहाण झाली. माझ्या चांगल्या कार्यकर्त्याला माधव जाधवला रेषेच्या बाहेर मारहाण झाली. तरीही पोलिसांनी लगेच गुन्हा नोंद करून घेतला नाही.
- 82 दिवस लागले कारण त्यांना कायद्याचे महत्वच वाटत नव्हते. संतोष देशमुख यांच्या प्रकरणापासून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला गांभीर्य आले असल्याचे देशमुख म्हणाले. दरम्यान कैलास फड हा मंत्री अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.