महाराष्ट्र

ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांना दणका, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी

  • अखेर ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यामध्ये उद्या दुपारी तीन वाजता शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
  • तीन वेळा आमदार राहिलेल्या साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतही साळवी यांनी काम केले. शिवसेनेकडून तीन वेळा त्यांनी राजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. परंतु महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता येताच साळवी यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली. त्यानंतरच्या काही काळ त्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारली. पण विधानसभेत पराभूत झाल्यानंतर पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्याची भावना मनात ठेवून पक्ष सोडण्याविषयीची भावना त्यांची झाली होती. अखेर त्यांनी आज निर्णय घेऊन शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.

Related Articles

Back to top button