खेळ
शमी उडा दो बाबर की गिल्ली, धोनीने घेतली पाकिस्तान संघाची फिरकी

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडिया- पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्ये आता उत्सुकता लागली आहे. चाहते ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना होणार आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक मनोरंजक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंग धोनी दिसतो. धोनी नेहमीच मैदानावर शांत स्वभावाचा दिसतो, पण यावेळी त्याची एक वेगळीच झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
- धोनी आक्रमक मूडमध्येही दिसतोय. या प्रोमोत धोनीने संघासाठी काही घोषणा दिल्या आहेत. माचिस की तिल्ली, शमी उड़ाओ बाबर की गिल्ली’ असे घोषवाक्य दिसत आहे. धोनीने इतरही काही घोषणा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये त्याचे चाहतेही त्याच्यासोबत आहेत.
- ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकादरम्यान कोहलीने हॅरिस रौफच्या चेंडूवर सरळ बॅटने षटकार लगावला होता. धोनीने त्याबद्दलही एक घोषणा दिली आहे. धोनी म्हणतो की आसमान में छाएगा, कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा, असे घोषवाक्य आहे. प्रोमोमध्ये माहीला पूर्णपणे आक्रमक दाखवण्यात आले आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये ज्या प्रकारची गती आणि खेळ दिसून येतो, त्याच प्रकारचे वातावरण धोनीने निर्माण केले आहे. दरम्यान धोनीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.