बिजनेस
ब्रेकिंग! सोन्याची महागाई थांबेना! आतापर्यंतचे मोडले सगळे रेकॉर्ड

- सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने, चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. देशांतर्गत सराफ बाजार असो किंवा फ्युचर्स मार्केट सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. स्पॉट मार्केट आणि फ्यूचर मार्केट्समध्ये सोन्याच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाली. या दिवसांत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल किंवा सोन्यात गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे.
- ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार एक तोळा सोन्याचे दर 88 हजार 500 रुपये झाले आहेत. सोने दराच्या इतिहासातील ही विक्रमी दरवाढ आहे. सोनेच नाही तर चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. सोन्याच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींचा यावर मोठा परिणाम झाला आहे.
- रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्ध कमी होत आहे. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे जगासाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. व्यावसायिक आणि व्यापारी वातावरण अस्थिर झाले आहे. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर झाला आहे.