क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर

- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराडसह इतर सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण अजूनही प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्यामुळे पोलिसांनी आंधळेला वॉन्टेड घोषित केले असून त्याला शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे. अशातच आता देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी आपली गाडी सोडून पोलिसांसमोरून पळताना दिसत आहेत. देशमुख हत्या प्रकरणी धाराशिवच्या वाशी येथील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटाचा हे सीसीटीव्ही फुटेज आहेत. 18 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसते की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हल्लेखोर काळ्या रंगाची गाडी सोडून रस्त्याने पळून जाताना दिसत आहेत. कारण त्यांना आपण केलेल्या गुन्ह्याची जाणीव होती. त्यामुळे पोलीस पाठलाग करत असल्यामुळे आरोपी पळत आहेत.
- देशमुख यांचा मृतदेह मारहाण झाल्यानंतर केज जवळील शिवारात फेकून देण्यात आला होता. ही हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. याचाच हा व्हिडिओ समोर आला आहे.