खेळ
टीम इंडियासाठी गुड न्यूज!

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
- दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह रिहॅब करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुमराह हा टीम इंडियातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या पाठीच्या दुखण्यासाठी स्कॅन करण्यात आले होते.
- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. तर टीम इंडियाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार युएईत खेळवले जातील. या स्पर्धेसाठी सर्व ८ संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. पण १२ फेब्रुवारीपर्यंत सर्व संघांना आपल्या स्क्वाडमध्ये बदल करण्याची संधी असणार आहे.
- जर बुमराह पूर्णपणे फिट असेल, तर ही टीम इंडियासाठी आनंदाची बाब असणार आहे. कारण टीम इंडियाला २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. या हाय व्हॉल्टेज सामन्यात बुमराहसारखा दिग्गज गोलंदाज संघात असणे हे टीम इंडियासाठी प्लस पॉईंट ठरेल.