बहिणीचं लग्न…डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू

सध्या कोणत्याही लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यू ओढवतो. लग्नातील एका व्हिडिओंमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
परिणीता नावाची तरुणी आपल्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात स्टेजवर डान्स करीत होती. यासाठी ती मध्यप्रदेशातील विदिशा येथे आली होती. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती आहे. ती स्टेजवर आनंदात नाचत होती. मात्र नाचता नाचता ती अचानक खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. या तरुणीला डान्स करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यात उपस्थित नातेवाईकांपैकी एक डॉक्टर होते. त्यांनी मुलीला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच हालचाल झाली नाही. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीता बहिणीच्या लग्नामुळे खूप आनंदी होती. तिचे एमबीएपर्यंतच शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती खासगी कंपनीत नोकरी करते. तिचा नाचायची आवड आहे. लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.