ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सनसनाटी आरोप

मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मात्र, पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून ते लवकरच आंधळेला पकडतील, असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी आंधळे बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आंधळे हा सायको किलर असून पोलिस भरतीची करत असतानाच तो गुन्हेगार झाला.
धस म्हणाले, देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने सुरु आहे. मात्र, आंधळे हा पोलिसांच्या कामगिरीला लागलेला कलंक आहे. आंधळे छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीची तयारी करत होता. मात्र, त्यानतंर तो गुन्हेगारीकडे वळला. तो सायको झाला होता. त्याला आपल्या आई-वडीलांशी देखील काही देणेघेणे नव्हते.
शिवाय तो अनेक गुन्ह्यात फरार होता. आतादेखील तो राज्याबाहेर लपून बसला असेल. शिवाय तो नामचीन गुंड नाही, त्यामुळे कधीतरी पकडला जाईलच. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास असून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही धस म्हणाले.
विष्णू चाटे हा देशमुखांच्या हत्येनंतर नाशिकमध्ये आला. यावेळी त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि गंगापूरच्या धरणात फेकून दिला. त्यानंतर तो पोलिसांना शरण गेला, असा दावा धस यांनी केला आहे.