क्राईम
श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली

- श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे आज मुंबईत निधन झाले. विकास वालकर यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलगी श्रद्धाच्या हत्येनंतर विकास हे निराश होते आणि मुलीवर अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेहाचे उर्वरित तुकडे मिळण्याची वाट पाहत होते, असे जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.
- श्रद्धाची हत्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने केली होती. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करून अनेक दिवस फ्रिज ठेवले होते. नंतर त्याने मेहरौलीमध्ये त्या तुकड्यांची टप्प्या टप्प्याने विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र श्रद्धाच्या शरीराचे तुकडे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
- आफताबने 18 मे २०२२ रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फ्रीज मध्ये ठेवले. सहा महिन्यांनंतर जेव्हा तिचे वडील विकास यांनी त्यांच्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रात दाखल केली होती तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे.