क्राईम

बाळीवेस, मधला मारुती-कौतम चौक तेथून शांती चौक

सोलापूर (प्रतिनिधी) बेपत्ता वृध्द महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह तिघांना ताब्यात घेतलं.त्यातील मुख्य आरोपी दिपक साळुंखे उर्फ बंदूख्या व त्याच्या पत्नीस अटक करून न्यायालयात उभं केलं असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली.पोलिसांच्या कोठडीत या हत्या प्रकरणातील अनेक रहस्यं प्रकाशझोतात येण्याची शक्यता आहे. मुख्य आरोपी दीपक साळुंखे यांने साळूबाईची हत्या नियोजीत कटातून झाल्याचे प्रारंभीचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,कस्तुरबा मार्केटमध्ये भाजी विक्री करून आपला चरितार्थ चालविणारी सुमारे ६० वर्षीय साळूबाई वाघमोडे ही,२५ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा मुलगा अशोक नामदेव वाघमोडे याने जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केली.या बेपत्ता महिलेच्या शोधासाठी पोलिसांनी मार्केटच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्या आधारे पोलिसांना ‘क्लू’ सापडला.
तरटी नाका रिक्षा स्टॉप जवळ साळूबाई घराकडे जाण्यासाठी ज्या रिक्षात बसली,त्या रिक्षाचा एम.एच.१३ सी.टी.५४८२ हा क्रमांक मिळाल्यावर त्या अंगाने पोलिसांनी तपास कार्याला गती दिली.त्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि दीपक साळुंखे (दोघे रा.जय मल्हार चौक, बाळे) पोलिसांच्या कचाट्यात सापडले.उभयतांची कसून चौकशी करता,पोलिसांना जे ‘सत्य कथन’ केले, त्यात दीपक साळुंखे याने ‘असं काही करायचं’ हे अगोदरच निश्चित केले होते,असं दिसते.
विधी संघर्षग्रस्त बालकाने प्रारंभी दिलेल्या जवाबानुसार, दीपक साळुंखे याने आज दुपारी आपल्याला एक भाडे आहे,लवकर गॅस भरून ये असं असं त्यास सांगितले होते. हा विधी संघर्षग्रस्त बालक रिक्षा चालवत होता.ते बाळीवेस, मधला मारुती-कौतम चौक-कन्ना चौक,राजेंद्र चौक मार्गे गुडलक बारपर्यंत व तेथून शांती चौक मार्गे अक्कलकोट रोडने रिक्षा दामटली.रिक्षा मल्लिकार्जुन नगर ओव्हर ब्रिजवर असताना त्या महिलेचा त्याच्या हाताने गळा दाबला.त्यावेळी दिपक सांळुखे यांनी त्याचे हातात पांढरे ग्लोज घातलेले होते,यावरून ही हत्या दिपकचा नियोजीत कट होता,हे स्पष्टपणे पुढं आले आहे.
दिपक सांळुखे यांने साळूबाईचा हाताने गळा दाबल्यानंतर, ती ओरडू लागली,त्यावेळी दिपकने तिच्याजवळचा स्कार्प घेऊन,तिच्या तोंडात कोंबून तिचा आवाज बंद केला. त्यानंतर निर्मणुष्य ठिकाणी त्या मृत महिलेचे दागिने काढून घेतले,तत्पूर्वी तिची मक्याच्या कणसांची पिशवी स्मशानभूमीच्या बाजूला फेकण्यात आली.
तिथून प्रवास सुरू झाला,साळुबाईच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचा…या थरारक हत्या प्रकरणात वापरलेल्या रिक्षाचं स्टेअरिंग दिपकने त्याच्या हाती घेतले.मुळेगांव रोडवरील एका घरगुती गॅस पॉईटच्या ठिकाणी आम्ही रिक्षात गॅस भरून,रिक्षा सोलापूर-पुणे रोडने सावळेश्वर टोल नाका पास करून पुढे आल्यानंतर,सिना नदीचे पुलावर थांबविली. त्यावेळी दिपकने,रिक्षात असलेल्या त्या वयस्कर अनोळखी बाईचे मृतदेह सिना नदीच्या वाहत्या पाण्यात पुलावरून खाली टाकून दिल्याचीही कबुली दिली.

Related Articles

Back to top button