ब्रेकिंग! रोहित शर्मा थोडक्यात बचावला

शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारण्यात रोहित शर्मा तरबेज आहे. चेंडूची गती कितीही असू द्या, शॉर्ट बॉल पडताच चेंडू बॅटला लागुन स्टँड्समध्ये जात असतो. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज मार्क वुडने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर रोहितला आश्चर्यचकीत करुन सोडले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.
राजकोटच्या मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहितवर मार्कने बाऊन्सरचा मारा केला. पहिल्या डावातील १० व्या षटकात मार्कने बाऊन्सर चेंडू टाकला, जो रोहितच्या हेल्मेटच्या ग्रीलला जाऊन लागला. या चेंडूने टप्पा पडताच इतकी उसळी घेतली की रोहितला अंदाजच आला नाही. दरम्यान चेंडू लागताच मार्क विचारपूस करण्यासाठी रोहितकडे गेला.
रोहितने सरासरी धावा या पुल शॉटवर केल्या आहेत. शॉर्ट बॉल मिळताच तो पुल शॉट मारतो. मात्र हाच शॉट खेळताना तो अनेकदा बादही झाला आहे. या डावात रोहितला बाद करण्यासाठी बेन स्टोक्सने सापळा रचला होता. त्याने मागे २ क्षेत्ररक्षक ठेवत मार्कला बाऊन्सरचा मारा करायला सांगितले. या चेंडूवर तो पुल करु शकला असता, मात्र त्याने असे काहीच केले नाही. तो डिफेन्स करायला गेला. याच प्रयत्नात चेंडू त्याच्या हेल्मेटला जाऊन धडकला. मुख्य बाब म्हणजे रोहितला कुठलीही दुखापत झालेली नाही.