देश - विदेश

भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला

  • भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे. या एकाच हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची काय लायकी आहे हे जगासमोर आले आहे. आता टरकलेल्या पाकिस्तानने भारताला घाबरून आणखी एक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून नवीन कर्ज मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी डिफेन्स बजेटमध्ये वाढीची घोषणा करत सांगितले की, आपला शेजारी (भारत) खूप खतरनाक आहे.
  • पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील एअर स्ट्राईक या घटना दोन्ही देशांतील तणावाचे पुरावे आहेत. आपला शेजारी देश खूप खतरनाक आहे. त्याने आपल्यावर रात्रीच्या वेळी हल्ले केले हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळेच सरकारने संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री इकबाल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button