बिजनेस

आनंदवार्ता! इतिहास घडला

जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.

नीति आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी पीटीआयला दिली.

सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला दिला. यानुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो, असा विश्वास सु्ब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button