हवामान

यंदा मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय?

  • सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन मे महिन्यात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मे महिन्यात पाऊस कसा काय पडत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
  • मे महिन्यात धो धो पाऊस पडण्याचे पहिले कारण म्हणजे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र. अरबी समुद्रात ज्या ज्या वेळी कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, त्या त्या वेळी पावसाचे प्रमाण वाढते. कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथला ओलावा शोषून घेते. या बाष्पयुक्त हवेला ढग वरती उचलून नेतात आणि पाऊस पडतो.
  • मे महिन्यात पाऊस होण्याचे दुसरे कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. वेस्टर्न डिस्टर्बन्सेसला मराठीतला शब्द शोधायचाच झाला तर पश्चिमी विकोप असे म्हणतात. थोडक्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे भूमध्य सागरातले वारे. सध्या हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तीव्र झाले आहेत.
  • या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे. बऱ्याच वेळा हे वारे उत्तर भारत किंवा मध्य भारतापर्यंत वाहतात. यंदा मात्र हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत.
  • यंदा अरबी समुद्रातील पाणी विविध कारणांमुळे जास्त उष्ण झाले आहे. त्यामुळे अरबी समुद्रात जास्त बाष्प तयार झाले आहे. त्यातच भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे बाष्प महाराष्ट्राकडे ढकलले जात आहे. त्यामुळे यंदा मे महिन्यातच राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.

Related Articles

Back to top button