क्राईम
वैष्णवी आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ पण…

- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असतानाच आता या प्रकरणात एका नवीन नावाभोवती संशयाचे ढग दाटले आहेत – ते नाव आहे निलेश चव्हाण. वैष्णवीच्या मृत्यूनंतर एका आठवड्यात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे.
- दरम्यान, या प्रकरणातील एका बाजूच्या कडीला जोडले गेलेले निलेश चव्हाण याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे, जी अत्यंत धक्कादायक आहे.
- निलेश हा करिष्माचा खास मित्र आहे. वैष्णवी आणि शशांक यांच्यातील कौटुंबिक वादांमध्येही तो अनेकदा सहभागी असायचा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ याच निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आले होते. निलेशची स्वतःचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.
- या गंभीर आरोपांमुळे आणि हगवणे कुटुंबाशी असलेल्या संबंधांमुळे निलेश हा वैष्णवी आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आणि सध्या दाखल असलेल्या धमकावण्याच्या गुन्ह्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. पोलिसांना आता निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील नेमके संबंध आणि त्याच्या भूमिकेचा सखोल तपास करावा लागणार आहे, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येऊ शकेल.



