राजकीय
ब्रेकिंग! मजबुरीमुळे काँग्रेस ‘जय भीम’ चा नारा देत आहे; मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला राज्यसभेत आज उत्तर दिले . राज्यसभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
- यावेळी मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींचे भाषण प्रेरणादायी आणि प्रभावी होते. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या कामगिरी, जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा, भारतातील सामान्य माणसाचा आत्मविश्वास, भारताचा विकास करण्याचा संकल्प अशा सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. पण काँग्रेससाठी कुटुंब प्रथम येते, तर आमच्यासाठी राष्ट्र प्रथम येते. काँग्रेसकडून ‘सबका साथ, सबका विकास’ अशी अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल. हे त्यांच्या विचारांच्या पलीकडे आहे आणि ते त्यांच्या रोडमॅपशी सुसंगतही नाही, कारण संपूर्ण पक्ष फक्त एकाच कुटुंबाला समर्पित आहे, अशी टिका मोदी यांनी काँग्रेसवर केली.
- काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करते आणि हे सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे आहेत. काँग्रेसने दोनदा निवडणुकीत आंबेडकरांना पराभूत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचा विचार केला नाही. या देशातील जनतेने बाबासाहेबांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर केला आहे. आज काँग्रेस नाराज आहे. त्यामुळे त्यांना मजबुरीमुळे ‘जय भीम’ चा नारा द्यावा लागत आहे, असे देखील मोदी म्हणाले.