महाराष्ट्र

ब्रेकिंग! सराईत गुंडांची धिंड काढा, अशी धिंड काढा की…

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास सराईत गुन्हेगारांनी बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, राजीव गांधीनगर परिसरातील 25 ते 30 वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजितदादा पवार पुण्याच्या पोलिसांवर भडकले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतींचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडले.

अजितदादा म्हणाले, चौबे तुम्हाला पंकज देशमुखला आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ( अमितेश कुमार ) मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? तरीही 5 फेब्रुवारीला बिबवेवाडीत 25 गाड्यात फोडल्या. त्यात रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. का होतेय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली. त्यांचा बंदोबस्त करा ना. मकोका लावा. काय करायचे ते करा. तुम्हाला एवढी मुभा आहे, हे मी मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगत आहे.

Related Articles

Back to top button