क्राईम
ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांची मोठी घोषणा
बीडला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, बीडमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे.
आज फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात शिंपोरा ते खुंटेफळ योजनेतील बोगद्याच्या कामाचे आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी फडणवीसांसह आमदार सुरेश धस, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अनेक नेते उपस्थित होते.
सरपंच परिषदेचे लोक देखील भेटले.अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. कोणीही असला तर कारवाई होणारच हा विश्वास देतो. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहे. बीडचा जो गौरवशाली इतिहास आहे तोच पुढे जाईल. या प्रयत्नांच्या मी पाठीशी उभे राहील, असेही फडणवीस म्हणाले.