राम मंदिर आंदोलनाचा खरा चेहराच आज प्राण प्रतिष्ठेला नाही जाणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त सोलापुरात उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानिमित्त देशातील हिंदू प्रथमच एकवटले आहेत. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिरातील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. या सोहळ्यासाठी अडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते कार्यक्रमाला येतील असे सर्वांना वाटत होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी अयोध्येला जाणे रद्द केले आहे.
अडवाणी हे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरा होते. त्यासाठी त्यांनी देशभर रथयात्रा काढली होती. अडवाणी यांची प्रकृती या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे प्रमुख कारण आहे. कडाक्याची थंडी हे देखील यामागचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिर उभारणे ही केवळ भाजपची इच्छा नसून त्यांचे ध्येय असल्याचे वक्तव्य अडवाणी यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला होता.