महाराष्ट्र
BREAKING! पुण्यात धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक

पुण्यातील लोणावळ्याजवळ धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या या दगडफेकीच्या घटनेत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
आज सकाळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली. कर्जत लोणावळ्यादरम्यान ही एक्स्प्रेस आली तेव्हा अज्ञातांनी दगड भिरकावले. यावेळी दगड लागून एक प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान रेल्वे स्थानकावर या प्रवाशावर उपचार करण्यात आले.
रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. हा दगड नेमकी कोणी भिरकावली त्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. रेल्वेवर दगड भिरकावल्याचे घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र या घटनांवर रेल्वे पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.