खुशखबर! हिरो एक्सट्रीमची झकास बाईक लाँच

काही दिवसांपूर्वीच बजाज ऑटोने पल्सर एनएस २०० चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच केले. या बाईकची किंमत एक लाख ५७ हजार ४२७ रुपये आहे. नवीन बजाज पल्सर एनएस २०० एनएस १२५ आणि एनएस १६० सह इतर एनएस सीरिजसह लाँच करण्यात आली होती. बजाज मोटारसायकलची स्पर्धा टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४ व्ही आणि हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्ही या प्रतिस्पर्ध्यांशी आहे.
हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्हीची एक्स शोरूम किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. बजाज पल्सर एनएस २०० ची किंमत हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्हीच्या तुलनेत थोडी जास्त आहे.
नवीन बजाज पल्सर एनएस २०० मध्ये १९९.५ सीसी, सिंगल सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. सहा स्पीड ट्रान्समिशनसह ई-२० कम्प्लायंट इंजिन ९ हजार ७५० आरपीएमवर २४.१३ बीएचपी पॉवर आणि ८,००० आरपीएमवर १८.७४ एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्ही मध्ये १९९.६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे ८ हजार ५०० आरपीएमवर १८.८ बीएचपी पीक पॉवर आणि ६ हजार ५०० आरपीएमवर १७.३५ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला फाइव्ह स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे.