महाराष्ट्र

खुशखबर! मुली व महिलांसाठी नवी घोषणा

सध्या लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू असताना आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुली व महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

येत्या नोव्हेंबरपासून एक हजार महिलांना पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, असे पाटील यांनी सांगितलं.

नवमीचा मुहूर्त साधून पाटील यांनी काल त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्या पूजन सोहळ्याचे आयोजन केले होते.

महिलांना व मुलींना चार तासांचे पार्ट टाइम जॉब मिळाले पाहिजेत, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. ती येत्या एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

एका मोठ्या कंपनीने माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर एक हजार मुलींना व महिलांना चार तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवली आहे. या जॉबसाठी त्यांना ११ हजार रुपये पगार मिळेल. एक वेळचा नाष्टा आणि एक वेळचे जेवण मोफत मिळेल. कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचीही मोफत सोय केली जाईल. यातील दोन नोकऱ्यांची पत्रं मी उद्याच देणार आहे, असेही पाटील यांनी जाहीर केले.लवकरच या संदर्भातील अधिकृत जाहिरात काढली जाईल. १२ वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील. कंपनी आणि आम्ही स्वत: या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ. त्यानंतर एक नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button