बिजनेस

ब्रेकिंग! दसऱ्याच्या मुहूर्ताला सोने महागले की स्वस्त झाले?

सोलापूर शहर व परिसरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात. मात्र, या सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापला जाणार आहे.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. 

Related Articles

Back to top button