मुख्यमंत्री म्हणाले- महायुती सरकारकडे कमिटी नाही तर डीबीटी
महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, कोणीही ‘माय का लाल’ आला तरी योजना बंद पडणार नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. मी गरीब कुटुंबातून आलो आहे. मी गरीबी पाहिलेली आहे.
माझी आई कशी तगमग करायची. कशा पद्धतीने कुटुंब चालवायची, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्याकडे अधिकार येताच, सर्वात आधी आमच्या लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला. महायुती सरकारकडे कमिटी नाही तर डीबीटीअसून सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. हा निर्णय आम्ही का घेऊ नये? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा एकही अधिकारी जागेवर ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.