खेळ

मोहम्मद सिराज बनला डीएसपी

  • टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलिसात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर सिराज यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. 
  • सिराजने अनेक मोठ्याप्रसंगी टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. सिराज यांच्यासोबत खासदार एम. अनिल कुमार यादव, खासदार आणि टीजीएमआरईआईएसचे अध्यक्ष मोहम्मद फहिमुद्दीन कुरेशी देखील होते. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी यापूर्वीच सिराज यांना प्रतिष्ठित गट-1 सरकारी पद मिळेल, अशी घोषणा केली होती. सिराज कर्तव्यावर रुजू झाल्यावर हे आश्वासन पूर्ण झाले. भविष्यातील तारे घडवण्याच्या योजनांसह राज्यातील क्रीडा आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेवर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

Related Articles

Back to top button