बिजनेस

भारीच! एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह स्पेशल स्मार्टफोन लॉन्च

अलीकडेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय मोबाइल कंपनी LAVA ने ‘Agni’ सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 3 5G सादर केला आहे. कंपनीने हा फोन ‘India’s 1st dual AMOLED Display’ स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. 

ज्यामध्ये तुम्हाला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस AMOLED स्क्रीन मिळेल. हा पॉवरफुल आणि प्रीमियम स्मार्टफोन लावा अग्नी 3 फोन इतर कंपन्यांच्या मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्सना जबरदस्त टक्कर देईल. Lava Agni 3 फोन 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस वेरिएंटची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. जे वापरकर्ते फोनसह चार्जिंग ॲडॉप्टर खरेदी करू इच्छित नाहीत, त्यांना दोन हजार रुपयांपेक्षा कमी म्हणजे 20,999 रुपयांमध्ये बेस व्हेरिएंट मिळेल.

कंपनीने हा फोन Heather Glass आणि Pristine Glass कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.याचा लुक इतरांपेक्षा वेगळा आणि अगदी विशेष आहे. हा एक ड्युअल डिस्प्ले फोन आहे, ज्याच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर स्क्रीन आहेत. 

Related Articles

Back to top button