महाराष्ट्र
ब्रेकिंग! यावेळेस उलथापालथ करावीच लागेल
बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाचा दसरा मेळावा होत आहे.राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. करोडोंच्या संख्येने समाज न्यायासाठी लढतोय. सहन करतोय. आमचा मूळ समाज सहन करण्याचा नाही. पण आम्ही सहन करतोय. मूळ स्वभाव फार दिवस लपून राहत नाही.
नारायणगडावर मला काही मर्यादा पाळाव्या लागत आहेत. पण न्याय मिळाला नाही तर आपल्याला उलथापालथ करावीच लागेल. आपल्या नाकावर टिच्चून कुठले निर्णय होणार असतील तर आपल्याला शांत बसता येणार नाही. आपला दोष काय हे कोणालाच सांगता येत नाही. आपल्या विरोधात षडयंत्र केले जात असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.