महाराष्ट्र

मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावर्षी राज्यात आपल्याला सहा दसरा मेळावे पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी, राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचा राजकीय दसरा मेळावा सुरू केला.

दरम्यान, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली होती. पार्थर्डी तालुक्यातील भगवान गडावर आज यंदा पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होत आहे. मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, असे हिंदीतून कविता म्हणत पंकजा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, मी कुणालाही घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Back to top button