राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांनी धमाका केलाच

  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही गटाकडून जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता ज्येष्ठ मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 
  • यावेळी अजितदादा पवार यांनी संयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक असतील, अशी घोषणाही केली. 
  • उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी अजितदादा म्हणाले की, अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. राष्ट्रवादी पार्टी पक्षात सयाजी शिंदे यांचा योग्य मान राखला जाईल.

Related Articles

Back to top button