सोलापूर

भारत-श्रीलंका मालिकेमुळे दोनशे कोटींचे नुकसान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी स्टार स्पोर्ट्सकडे फक्त २ ते ३ जाहिरातदार शिल्लक आहेत. टीव्ही व्यतिरिक्त, स्टार स्पोर्ट्सला डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील जाहिरातदार मिळत नाहीत. यामुळे चॅनलचे मोठे नुकसान होत आहे.

सामना दाखवण्यासाठी स्टार स्पोर्ट्स बीसीसीआयला प्रत्येक मॅचसाठी ६०.०१ कोटी रुपये देते. पण यातून स्टारने आतापर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच कमाई केली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या मालिकेमुळे ब्रॉडकास्टर्सना सुमारे २०० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
नवीन वर्षानंतर लगेच प्रसारित होणारी कोणतीही मालिका अपेक्षेपेक्षा कमी पाहिली जाते. मोठ्या कंपन्या जाहिराती देण्याचे टाळतात. विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल राहुलसारखे मोठे खेळाडू खेळत नाहीत.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप