ब्रेकिंग! दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली

Admin
1 Min Read
  • शिर्डी दुहेरी हत्येच्या घटनेने हादरली आहे. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तींवर वार करण्यात आले आहेत. साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी कर्मचारी नितीन शेजूळ या दोघांची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
  • आज पहाटे घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहिल्या घटनेची दखल न घेतल्याने तसेच अपघात असल्याचे सांगून गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
  • बाईकवर दोन जणांनी हा प्रकार केल्याचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. रस्त्यावर लुटीतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. आरोपींचा शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयत सुभाष घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
Share This Article