ब्रेकिंग! धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले

मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे हे विधानसभेपूर्वी मला भेटायला आले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी भेट घेण्यासाठी मुंडे हे आठ दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांनी मला फोनही केले होते. त्यानंतर एक दिवशी ते रात्री दोन वाजता भेटण्यासाठी आले. त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता. भेटीत बोलताना मुंडे म्हणाले, मराठ्यांनी मला मोठे केले आहे. तुम्ही मला सांभाळा, असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
मुंडे हे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता आणि मला सांभाळा, असे म्हटले. मी झोपलो होतो, ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार, असे त्यांना म्हटले होते. त्यांनी लक्ष राहुद्या, असे म्हटले. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहेत. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या. या टोळीमुळे, असा दावाही जरांगे यांनी यावेळी केला.



